दांडीयामध्ये रमले छोट्या पडद्यावरील कलाकार

झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘झी युवा दांडिया २०१८’ चं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला.

  • दांडीयामध्ये रमले छोट्या पडद्यावरील कलाकार
  • दांडीयामध्ये रमले छोट्या पडद्यावरील कलाकार
SHARE

सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘झी युवा दांडिया २०१८’ चं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. झी युवाने सर्व कलाकारांना एकत्र आणून कलाकार आणि प्रेक्षकांची नवरात्र उत्साहपूर्ण बनवली.मनसोक्त आनंद लुटला

ठाण्यात पार पडलेल्या या दांडिया कार्यक्रमात झी युवावरील ‘फुलपाखरू’मधील हृता दुर्गुळे व यशोमन आपटे, ‘आम्ही दोघी’ मालिकेतील प्रसिद्धी किशोर, खुशबू तावडे, ‘बापमाणूस’मधील सुयश टिळक, पल्लवी पाटील आणि श्रुती अत्रे तसंच नवीनच सुरु झालेल्या ‘सूर राहू दे’ आणि ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकांमधील कलाकार गौरी नलावडे, संग्राम साळवी, तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे उपस्थित होते. देवीचा आशीर्वाद घेऊन सर्व कलाकारांनी गरबा आणि दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत त्यांचे कलाकारांनी आभार देखील मानले.हेही वाचा -

गरब्याच्या तालावर थिरकायचंय? मग या ५ ठिकाणी भेट द्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या