Advertisement

आता ट्राय करा चटपटीत पिझ्झा वॉफल


आता ट्राय करा चटपटीत पिझ्झा वॉफल
SHARES

वॉफल हा मूळचा बेल्जियम पदार्थ. पण हा पदार्थ आता आपल्याकडेही मुबलक प्रमाणात मिळू लागला आहे. वॉफल्स विकणाऱ्या स्वतंत्र कॅफेची संख्याही वाढू लागली आहे. या कॅफेमध्ये वॉफल्सचे अनेक प्रकार मिळतात. चॉकलेट वॉफल, आईस्क्रिम वॉफल, बबल वॉफल्स या प्रकारातील वॉफल्स आपल्यापैकी अनेकांनी खाल्ले असतील. आता या प्रकारामध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे 'पिझ्झा वॉफल्स'ची.


कुछ तिखा हो जाए

चॉकलेट वॉफल, आईस्क्रिम वॉफल, बबल वॉफल्स हे सर्व वॉफल्सचे प्रकार चवीला गोड लागणारे. पण पिझ्झा वॉफल मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे. ठाण्यातल्या 'वॉट अ वॉफल्स' इथं तुम्हाला पिझ्झा वॉफल हा भन्नाट सर्व्ह केला जातो. इथले बहुतांश पदार्थ गोड आहेत. पण काही तरी वेगळं म्हणून वॉट अ वॉफल्सनं पिझ्झा वॉफल लाँच केलं. वॉट अ वॉफल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉफल्स खाता येतील. पेरी पेरी मशरुम पिझ्झा वॉफल्स, मार्गारीटा, फ्रेश व्हेजी, व्हेज एक्जोटिक, ४ स्पाईस, शेजवान पनीर अशा प्रकारचे वॉफल्स देखील ट्राय करू शकतात.डिजर्ट वॉफल्स

वॉट अ वॉफल्सबद्दल बोलतोय मग त्यांच्या खास डिजर्टचं नाव तर आलंच पाहिजे. इथं बेल्झियम स्टाईल वॉफल्स ते अमेरिकन स्टाईल पॅनकेक्स असं सर्व काही मिळतं. तुम्ही तिकडे गेलात तर पिझ्झा वॉफल्ससोबत आणखी एक पदार्थ ट्राय करू शकता तो म्हणजे 'ब्राऊनी नटेला वॉफल्स'. दोन वॉफल्सच्या मध्ये मार्शमॅलोज असतात आणि टॉपिंगला स्प्रिंकल भुरभुरलेले असतात.

कुठे : वॉट अ वॉफल्स, शॉप ११, गोल्ड क्रॉफ्ट, राज मेडिकोच्या पुढे, हिरानंदानी, ठाणे
वेळ : ११.३० ते १२.३०संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा