Advertisement

आता ट्राय करा चायनीज थाळी


आता ट्राय करा चायनीज थाळी
SHARES

प्रत्येकासाठी अन्नाची परिभाषा ही वेगळी असते. काही मुळातच अगदी खवय्ये असतात. त्यांच्या आयुष्यात सर्वात सुख देणाऱ्या गोष्टींमध्ये खाद्य प्रथमस्थानी असतं. अशा खवय्यांसाठीच बहुदा थाळी हा प्रकार असावा. वेगवेगळ्या प्रांतात जाऊन जर थाळी ऑर्डर केलीत तर त्या प्रांतात जायलाच पाहिजे असं मुळीचं नाही. हल्ली प्रत्येक प्रांतातील पदार्थ मुंबईत चाखायला मिळतात.


चायनीज थाळीची खासियत 

आता हेच बघा ना, मुंबईत पहिल्यांदा चायनिज थाळी खवय्यांसाठी सादर केली आहे. आतापर्यंत तुम्ही दारासिंग थाळी, महाराजा थाळी असे थाळ्यांचे प्रकार पाहिले असतील. पण चायनीज थाळी हा प्रकार पहिल्यांदाच वाचला असेल. अंधेरीतल्या ओहानाजमध्ये चायनीज थाळी खवय्यांना चाखता येणार आहे.


दोन पर्याय

ओहानाजमध्ये तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेत. एक म्हणजे व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळी. व्हेज थाळीत व्हेज मंचुरीयन, हनी चिली पोटॅटोज, कुंग पू पनीर, पनीर ब्लॅक पेपर , क्रिस्पी व्हेज आणि राईस किंवा नूडल्स या पदार्थांचा व्हेज थाळीत समावेश आहे. व्हेज थाळीसाठी तुम्हाला ७९९ रुपये मोजावे लागतील. नॉनव्हेज थाळीत चिकन लॉलीपॉप, क्रिस्पी चिकन, चिकन, बटर गार्लिक चिकन, राईस किंवा नूडल्स या पदार्थांचा थाळीत समावेश आहे.

कुठे : ओहानाज, सी-६, ग्रीन पार्क सोसायटी, एमसीजीएम पार्क गेट, बेस्ट कॉलनी रोड, ७ बंगलो, अंधेरी (प.)
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा