Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

बोरीवली फुटबाॅल लीग : अमेय भटकळच्या हॅटट्रिकमुळे मिलान क्लबचा चौथा विजय


बोरीवली फुटबाॅल लीग : अमेय भटकळच्या हॅटट्रिकमुळे मिलान क्लबचा चौथा विजय
SHARES

स्ट्रायकर अमेय भटकळने झळकावलेल्या शानदार हॅटट्रिकमुळे मिलान क्लबने एनडी२ साॅकर स्टार्झ संघावर ३-२ असा थरारक विजय मिळवला. बोरीवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिस डी असिसी हायस्कूल ग्राऊंडवर सुरू असलेल्या बोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगमध्ये (बीपीएफएल) चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह मिलान क्लबने अ गटात १२ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले अाहे.


सुरुवातीलाच मिलानची अाघाडी

१९व्या मिनिटाला अमेय भटकळने केलेल्या गोलमुळे मिलान क्लबने खाते खोलले. तीन मिनिटांनंतर त्याने झळकावलेल्या दुसऱ्या गोलमुले मिलान क्लबने सुरुवातीलाच २-० अशी अाघाडी घेतली. ५४व्या मिनिटाला त्याने अापली हॅटट्रिक साजरी केली. साॅकर्स स्टार्झकडून धुवल वाघेलाने ३९व्या मिनिटाला तर प्रथमेश नलावडेने ४७व्या मिनिटाला गोल केले.


वायब्रंट्स एससीचा पहिला विजय

वायब्रंट्स स्पोर्टस क्लबने तळाच्या स्थानावर असलेल्या काजूपाडा फुटबाॅल क्लबला ३-१ असे हरवत या लीगमधील पहिल्या विजयाची नोंद केली. वायब्रंट्सकडून निधिम जोसेफ (४०व्या मिनिटाला), कुणाल माने (४५व्या मिनिटाला) अाणि दैविक राव (५२व्या मिनिटाला) यांनी गोल केले. काजूपाडाकडून एकमेव गोल श्रीरंग गोळे (५०व्या मिनिटाला) याने केला.


हेही वाचा -

बोरीवली फुटबाॅल लीग : अंकित दळवीच्या गोलमुळे मिलान क्लबचा तिसरा विजय

कुलाबा केंद्राला बिपिन अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपदसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा