Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

बोरीवली फुटबाॅल लीग : अंकित दळवीच्या गोलमुळे मिलान क्लबचा तिसरा विजय


बोरीवली फुटबाॅल लीग : अंकित दळवीच्या गोलमुळे मिलान क्लबचा तिसरा विजय
SHARES

अंकित दळवी याने दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे मिलान क्लबने चॅलेंजर्स एफसीचा १-० असा पाडाव करत बोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगमध्ये तिसऱ्या विजयाची नोंद केली. एमडीएफएच्या मान्यतेने बोरीवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिस डी असिसी हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोलशून्यची कोंडी फोडता अाली नाही. मात्र ६०व्या मिनिटाला अंकित दळवीने गोल करून मिलान क्लबच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या विजयासह मिलान क्लबने नऊ गुणांसह ब गटात अव्वल स्थान पटकावलं अाहे.


साॅकर स्टार्सचा दणदणीत विजय

ब गटातील अन्य सामन्यात एनडी२ साॅकर स्टार्स संघाने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत शेलार एफसीवर ५-१ असा दणदणीत विजय साकारला. ध्रूवल वाघेलाची हॅटट्रिक या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. त्याचबरोबर प्रतिक शेट्टी यानेही गोल करत विजयात योगदान दिले. शेलार एफसीकडून एकमेव गोल प्रसाद सारंग याने केला.


हेही वाचा -

बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये मिलान क्लबचा धडाकेबाज विजय

एमडीएफए घडवणार नवे फुटबाॅल रेफ्रीRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा