SHARE

देशाला अनेक स्टार फुटबाॅलपटू देणाऱ्या मुंबई जिल्हा फुटबाॅल असोसिएशनने (एमडीएफए) अाता रेफ्री घडविण्यासाठीही पुढाकार घेतला अाहे. 16 अाणि 17 डिसेंबर रोजी अंधेरीतील शहाजी राजे क्रीडा संकुलात रेफ्रींसाठी एका अभ्यासक्रमाचे अायोजन करण्यात अाले असून तरुणांना फुटबाॅलचे नियम शिकवले जाणार अाहेत.

किमान दहावी पास असलेल्या 40 वर्षांखालील पुरुष अाणि महिलांना या अभ्यासक्रमात भाग घेता येईल. एमडीएफएशी संलग्न असलेल्या सर्व क्लब्सना या अभ्यासक्रमासाठी अापले दोन प्रतिनिधी पाठवता येईल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता एक हजार रुपयांचे शुल्क अाकारण्यात येईल. इच्छुकांनी http://mdfaofficial.com/news_internal.php?id=170 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.

संबंधित विषय
ताज्या बातम्या