Advertisement

अमिगो एफसीला दुहेरी मुकुट


अमिगो एफसीला दुहेरी मुकुट
SHARES

अमिगो एफसी संघाने १६ वर्षांखालील गटात जेएमडी बॉइज संघाचा आणि १८ वर्षांखालील गटात जोसेफ बॉइज संघाचा पराभव करत शिवस्वप्न फाऊंडेशन आणि लायकांस फुटबॉल अकादमी आयोजित युवासेना फुटबॉल चषक स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. ठाणे पूर्व येथील धरमवीर मैदानावर झालेल्या दोन्ही गटांच्या अंतिम फेरीत प्रणव मोरे या युवा फुटबाॅलपटूने छाप पाडली. 


प्रणव मोरेचा निर्णायक गोल

१६ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत २-२ अशी बरोबरी असताना अाघाडीवीर प्रणय मोरेने शेवटच्या मिनिटांमध्ये केलेल्या निर्णायक गोलामुळे जोसेफ बॉईज संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवत अमिगो एफसीने विजेतेपदाला गवसणी घातली. प्रणवसह सनी सिंगने प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. जोसेफ संघाच्या बचावपटूने केलेल्या स्वयंगोलमुळे अमिगोच्या खात्यात तिसऱ्या गोलाची भर पडली. पराभूत संघाकडून शाकिब शेखने दोन्ही गोल झळकावले.


दुहेरी यशात प्रणव मोरेचाही वाटा

आपल्या दुहेरी यशावर शिक्कामोर्तब करताना अमिगो एफसी संघाने जेएमडी बॉइज संघाचे आव्हान ३-१ असे परतवून लावले. या सामन्यात कनिष्ठ गटातील आक्रमक खेळाडू प्रणय मोरेने दोन आणि प्रवीण पांडेने एक गोल केला. जेएमडी बॉईज संघाचा एकमेव गोल अतुलने केला. ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत दोन्ही गटामध्ये प्रत्येकी २० संघ सहभागी झाले होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा