SHARE

भारतात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाबद्दल भारतीय फुटबॉल प्रेमी चांगलेच उस्ताहात दिसत आहे. फिफा विश्वचषकानंतर नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) या स्पर्धेचे वारे भारतात आतापासूनच वाहत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी मुंबईत आयएसएलमधील संघ एफसी पुणे सिटी याच्या नव्या ब्रँड अॅम्बेसिडरची घोषणा करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आता पुणे संघाचा नवा ब्रँड अॅम्बेसिडर असणार आहे. पुणे संघाचे सिईओ गौरव मोडवेल यांनी याची घोषणा केली.


ऋतिकच्या जागी अर्जुनची निवड

याआधी पुणे संघाचा ब्रँड अॅम्बेसिडर ऋतिक रोषन होता. पण आता ऋतिकच्या जागी अर्जुन कपूर याची निवड करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये चालू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयएसएलमधील प्रत्येक संघ हा आता जोरदार तयारीला लागला आहे. पुणे संघाच्या स्थानिक अकादमी आहेत. त्यात ज्युनियर संघ अंडर-१८, १६ आणि १४ तसेच महिला संघ देखील आहेत.

काय म्हणाला अर्जून कपूर?

मी स्वत: फूटबॉलप्रेमी आहे, फूटबल बघणेच नाही तर खेळायलाही आवडते. मी माझ्या मित्रांसोबत फुटबॉल खेळतो. यामुळे आपले फीटनेस व्यवस्थित राहतं. आज मुली देखील प्रत्येक खेळात पुढे आहेत. असे अर्जुन कपूर याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या