Advertisement

मुंबईत एकाचवेळी ३ लाखांहून जास्त विद्यार्थी खेळणार फुटबॉल


मुंबईत एकाचवेळी ३ लाखांहून जास्त विद्यार्थी खेळणार फुटबॉल
SHARES

भारतात होणाऱ्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे सर्वांनाच वेध लागलेत. येत्या ६ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा नवी मुंबईतील डी. वाय. स्टेडियममध्ये सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर फुटबाॅलला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे १५ सप्टेंबर रोजी 'महाराष्ट्र मिशन वन मिलियन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात मुंबईतून होणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते बॉम्बे जिमखाना येथे होणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मुंबईतील एकूण ३ लाखांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा दिवसभर सुरू राहणार आहे. यांत मुंबईचे डबेवाले, कॅन्सरग्रस्त आणि मूक-बधीर विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असणार आहे. 

मुंबईतील बॉम्बे जिमखाना, आझाद मैदान, ओव्हल मैदान, शिवाजी पार्क आणि मारिन लाइन्स यासह शहरातील इतर मैदानावर फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सध्याची मुले मैदानावर कमी आणि मोबाईल, कम्प्युटरमध्ये अडकली आहेत. अशा मुलांना मैदानावर उतरविण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



हे देखील वाचा -

फिफा अंडर-17 ट्रॉफीचे अनावरण

फिफा अंडर-17च्या या प्रोमो साँगची फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ!



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा