Advertisement

फिफा अंडर-17 ट्रॉफीचे अनावरण


फिफा अंडर-17 ट्रॉफीचे अनावरण
SHARES

फिफा या 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण बुधवारी नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडिअमवर करण्यात आले.

कार्लोस वाल्डेर्रमा (कोलंबिया), फर्नांडो मॉरिएंट्स (स्पेन), मार्सेल डीसेलै (1998 फुटबॉल विश्वचषक विजेता, फ्रान्स), जॉर्ज कॅम्पोस (मेक्सिको) आणि इम्म्युन्युएल अमुनेके (नायजेरीया) या प्रसिद्ध फुटबॉलपटूंची उपस्थिती होती.

यावेळी इंडियन आयकॉन्स आणि फिफा लिजेन्ड्स यांच्यात सामना देखील खेळवण्यात आला. या सामन्यात फिफा संघाने 5-4 अशी बाजी मारत विजय मिळवला. स्पेनच्या फर्नांडो मॉरिएंट्सने सुंदर असा खेळ करत फिफाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 20 मिनिटांच्या या सामन्यात मॉरिएंट्सने 4 गोल करत आपले वर्चस्व राखले. तर इंडियन आयकॉन्सकडून बाला देवीने एक गोल नोंदवला.

 


इंडियन आयकॉन्स संघात भारतीय महिला संघाची कर्णधार बाला देवीसह स्टीव्हन डियास, अर्जुन पुरस्कार विजेती ओनाम बेमबेम देवी, मिशन इलेव्हन मिनियनचे दोन युवा खेळाडू, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, बॉलिवूड चित्रपट निर्माता सुजीत सरकार आणि भारताचे माजी गोलरक्षक हेन्री मेनेजेस यांचा सहभाग होता.


'घरच्या मैदानावर खेळताना खूप दबाव असतो'

फ्रान्स संघातील स्टार खेळाडू मार्सेल म्हणाला, 'भारतीय संघ हा घरच्या मैदानावर खेळणार आहे. हे खूप महत्वाचे आहे. यासाठी त्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या तयार राहावे लागेल. कारण घरच्या मैदानावर खेळताना खूप दबाव असतो ते कठीण असते. 1998 साली विषवचशक आम्ही घरच्या मैदानावर जिंकण्यात यशस्वी ठरलो'.


भारतीय युवा खेळाडूंना खेळताना पाहिले नाही - इम्म्युन्युएल

'मी भारतीय युवा खेळाडूंना खेळताना पाहिले नाही. ते पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना यामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल आणि प्रेरणा देखील. जर त्यांनी चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आणि सांघिक खेळ करण्यात यश मिळवले. तर ते नक्कीच चांगली कामगिरी करण्यात यश मिळवतील, असे नायजेरियाचा दिग्गज खेळाडू इम्म्युन्युएल याने सांगितले.


हेही वाचा - 

फिफा अंडर-17च्या या प्रोमो साँगची फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ!

'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा