SHARE

फिफा वर्ल्डकप महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भारतातील फुटबॉलप्रेमींची उस्तुकता चांगलीच वाढली आहे. त्यात आणखी भर पडावी म्हणून एक खास प्रोमो साँग तयार करण्यात आलं आहे. 'कर के दिखा दे गोल' असे या गाण्याचे बोल आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलचा चेहरा बायचुंग भुतिया आणि भारतीय महिला फुटबॉल खेळाडू बाला देवी यांच्यासोबत हे प्रोमो साँग तयार करण्यात आलं आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंग, शान, पपोन आणि बाबुल सुप्रियो या सर्वांनी मिळून हे गाणे गायले आहे. फिफा अंडर-17 ही स्पर्धा भारतातील सहा ठिकाणी खेळवली जाणार आहे. येत्या 6 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

या गाण्यामध्ये भारतातील ज्या सहा राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे, त्या राज्यांच्या संस्कृतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात भारतातील प्रत्येक शहरातील गल्ली बोळापासून ते शाळेतील मैदाने, इमारतींमधील पटांगण, शेतापासून ते फुटबॉलच्या स्टेडियमपर्यंत खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलचे दर्शन या गाण्यातून सहज होताना दिसत आहे.हेही वाचा - 

'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन

विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल


संबंधित विषय
ताज्या बातम्या