विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल

Mumbai
विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल
विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल
विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल
विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल
विधीमंडळात एकमेकांच्या तंगड्या खेचणाऱ्यांनी एकत्र खेळला फुटबॉल
See all
मुंबई  -  

विधीमंडळाचं कुठलंही सभागृह असो सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवर एकमेकांच्या तंगड्या खेचतानाच दिसून येतात. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही हेच चित्र दिसून आलं. मात्र गुरूवारचा दिवस याला अपवाद ठरला. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांनी राजकीय मैदानातून थेट खेळाच्या मैदानात उडी मारत एकत्र येऊन चक्क फुटबॉल खेळला.

भारतात होत असलेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन इलेव्हन मिलियन' उपक्रमाची घोषणा केली असून राज्यातही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाला चालना मिळावी तसेच अधिवेशनाच्या कामकाजातून आमदारांना थोडा विरंगुळा मिळावा यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानभवनच्या पार्किंग एरियामध्ये हा फुटबॉल सामना खेळवण्यात आला.
सामना अध्यक्ष ११ च्या खिशात

सभापती ११ विरुद्ध अध्यक्ष ११ म्हणजेच विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता. दोन्ही संघात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदार खेळाडूंचा समावेश होता. अटीतटीच्या या सामन्यात अध्यक्ष संघाने 2-1 च्या फरकाने हा सामना खिशात घातला.मुख्यमंत्री बनले समालोचक

कुठलाही सामना म्हटला की त्यात पंच आणि मैदानाबाहेरुन सामन्यात रंग भरणाऱ्या समालोचकाची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या वाक चातुर्याने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामन्यादरम्यान समालोचकाची भूमिका निभावली. नेहमी आपल्या आक्रमक भाषणाने विरोधकांवर तोफ डागणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुंदर समालोचन करून सामन्याची रंगत वाढवली. तर तावडे या सामन्यात पंच बनले.


नाणेफेक कोण जिंकलं ?

रामराजे नाईक निंबाळकर (सभापती 11) यांच्या संघाने नाणेफेक जिंकलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला. या सामन्यावेळी बरंच खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.असे होते संघातील खेळाडू :

अध्यक्ष 11- आशिष शेलार, इम्तियाज जलील, सुनील शिंदे, जयकुमार रावल, संग्राम थोपटे, जयकुमार गोरे, राज पुरोहित, राजू तोडा साम, महेश लांडगे, नरेंद्र पवार, राहुल कूल, संतोष दानवे

सभापती 11 - नरेंद्र पाटील, उन्मेष पाटील, निरंजन डावखरे, संभाजी निलंगेकर, जयंत जाधव, प्रशांत ठाकूर, परिणय फुके, बाळाराम पाटीलही मॅच फिक्स होती - तटकरे

सभापतींना हरवण्यासाठी जाणीवपूर्वक भाजपाचा कॅप्टन देण्यात आला. मुख्यमंत्री नेहमी क्लिन चिट देतात. पण त्याअगोदर मॅचची चौकशी झाली पाहिजे. पुन्हा सामना खेळला गेला पाहिजे असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सामन्यावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी कॉमेंट्रीचा माईक आपल्या हातात ठेवला. विरोधकांना बोलू दिले नाही. नेहमीप्रमाणे त्यांचा आवाज दाबला ही मॅच फिक्स होती. त्यामळे या मॅचची चौकशी व्हावी असे तटकरे यांना सांगताच सभागृहात हास्यस्फोट झाला. त्यावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी चौकशी मागणी मान्य करताना निलंगेकर कुठे होते? हे माहित नाही. पण बॉल राष्ट्रवादीचा होता, असे सांगितले.


हे काय खेळायचं वय आहे का? अजित पवार

दरम्यान विधानसभेत अध्यक्षांनी दुपारी सभागृहात आज १ तास फुटबॉल खेळण्यासाठी सूट दिली जात आहे, असे सांगताच अजित पवार यांनी त्याला विरोध केला. हे काय खेळायचं वय आहे का? ज्याला खेळायचं त्यांनी खेळावं, फुटबॉल खेळायला हे आपलं वय राहिलंय का?
इथे न खेळताच अनेक सदस्यांचा हात मोडला. आता काय पाय मोडायचा का?, आपण धोतर घालून कसं फुटबॉल खेळणार? असा सवाल देखील अजित पवार यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे याना केला.

दरम्यान विनोद तावडे यांनी अजित दादा आपण महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहात आपण नकार दिलात तर कसे चालेल. खेड्यापाड्यातील १० लाख मुले या स्पर्धेत खेळणार आहेत. जर तुमची अनुमती नसेल तर आमदारांनी फुटबॉल खेळण्याचा कार्यक्रम रद्द करू, असे तावडे यांनी अजित पवारांना सांगताच त्यांनी फुटबॉल खेळण्यास होकार दिला.हे देखील वाचा -

भारतीय फुटबॉल संघ कुणालाही घाबरत नाही - माटोस


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.