जांबोरी स्पोर्ट्सची फुटबॉल स्पर्धा शनिवारपासून

 Parel
जांबोरी स्पोर्ट्सची फुटबॉल स्पर्धा शनिवारपासून

गेल्या 6 वर्षांप्रमाणे यंदाही पावसाळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जांबोरी स्पोर्ट्स क्लब आणि चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. या स्पर्धेत एकूण 33 जिल्हास्तरीय संघाचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा यावेळी परळ येथील झेवियर्स मैदानावर 17 आणि 18 जून रोजी रंगणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन 17 तारखेला सकाळी नगरसेवक, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर, 18 जून रोजी बक्षिसांचे वितरण महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि भारतीय फुटबॉल संघाचा खेळाडू राजू गायकवाड यांच्या हस्ते केले जाणार आहे. स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघाला आकर्षक पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. फुटबॉल या खेळाची रुची वाढावी म्हणून स्थानिक खेळाडू आणि संघांना 100 फुटबॉल मोफत दिले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Loading Comments