Submitting your vote now
  कोणती टीम घेेणार सगळ्यात जास्त विकेट्स?
  *One Lucky Winner per
  match. Read T&C
  व्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.
  Enter valid name
  Enter valid number

  विलिंगडन जिमखान्यात रंगला फुटबॉल स्पर्धेचा थरार

  Khar
  विलिंगडन जिमखान्यात रंगला फुटबॉल स्पर्धेचा थरार
  मुंबई  -  

  विलींगडन कॅथोलीक जिमखान्यानं आयोजित केलेल्या ३०व्या इंटर पॅरीश रिंक फुटबॉल टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात बोरिवलीच्या मुलींनी एकतर्फी खेळी करत बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात बोरीवलीच्या इम्याक्युलेट कन्सेपशन पॅरीश (Immaculate Conception Parish) या संघानं ४-१नं सेक्रेट हार्टवर मात केली. ही स्पर्धा विलींगडन जिमखान्याच्या कोर्टवर खेळवण्यात आली.

  या सामन्यात बोरिवलीच्या सलामवीर वेलनसिया डीमेल्लो (Valencia D’Mello) आणि नओमी फर्नांनडीस (Naomi Fernandes) या दोघींनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे संघाला विजयी होण्यास सोयीस्कर ठरले. तसंच प्रतिस्पर्धी असलेल्या सेक्रे़ड हार्ट संघानं देखील आक्रमक खेळी करून गोल करण्याचा प्रयत्न केला. पण इम्याक्युलेट संघाच्या खेळाडूसमोर प्रतिस्पर्धी खेळाडूंना जास्त काळ टिकता आले नाही. सेक्रेड हार्टच्या एन्नेटे मस्कारेनहास (Annette Mascarenhas) याने एकमेव गोल करत संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

  ओपन वेतरन पुरुष गटात बांद्रा पॅकर्सनं गोल्डन गनर्स संघाला १-० अशा फरकानं हरवलं. पहिल्या सत्रात बांद्रा पॅकर्सच्या क्लारी रेमेडीओस (Clarie Remedios) यांनी सुंदर खेळी करत गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर गोल्डन संघाकडून देखील प्रतिस्पर्ध्यांना कडवे आवाहन देण्यात आले. पण त्यात त्यांना यश मिळवता आले नाही. या स्पर्धेतील नओमी फर्नांडिस आणि वेतरन गटात क्लारी रेमेडीओस यांचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सत्कार करण्यात आला.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.