Advertisement

मुंबईकरांना फुटबॉलमधील टॉप संघाचे सामने पाहण्याची सुवर्णसंधी


मुंबईकरांना फुटबॉलमधील टॉप संघाचे सामने पाहण्याची सुवर्णसंधी
SHARES

भारतात पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या फिफा अंडर-१७ या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला काही दिवसच शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी आता मुंबईकरांची उस्तुकता देखील शिगेला पोहचली आहे.

अशाच मुंबईकर फुटबॉल प्रमींना ब्राझील, इग्लंड आणि न्युझीलंड या संघाचा सराव सामना बघण्याची संधी मिळणार आहे. अंडर-१७ वर्षाखालील हे संघ मुंबईतील अंधेरी स्पोर्टस कॉम्पलेक्स येथे आपल्या प्रशिक्षण शिबीर आणि सराव सामन्यासाठी खेळणार आहेत. २६ सप्टेंबरपासून होणारे हे अव्वल संघाचे सामने प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना मिळणार आहे.

भारताचा वरिष्ठ फुटबॉल संघ देखील आशियाई पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी येथे सराव करणार आहे. यासाठी न्युझीलंड संघ देखील मुंबईत शुक्रवारी दाखल झाला आहे.


अशा प्रकारे होतील सराव सामने

  • २६ सप्टेंबर - ब्राझील संघाचा सराव सायं. ५ वाजता
  • २७ सप्टेंबर - ब्राझील संघाचा सराव सायं. ५ वाजता
  • २८ सप्टेंबर - ब्राझील विरुद्ध न्युझीलंड सायं. ५ वाजता
  • २९ सप्टेंबर - इंग्लंडचा सराव सायं. ४ वाजता
  • ३० सप्टेंबर - ब्राझील विरुद्ध हिंदुस्तानी संघ रात्री ८.१५ वाजता
  • १ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सायं. ५ वाजता
  • २ ऑक्टोबर - ब्राझील संघाचा सेवाभावी उपक्रम (शिवाजी पार्क किंवा अंधेरीत) सायं. ४.३० वाजता

हेही वाचा - 

मुंबईत एकाचवेळी ३ लाखांहून जास्त विद्यार्थी खेळणार फुटबॉल


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा