भारतीय अंडर-17 फुटबॉल संघाची नवीन जर्सी


भारतीय अंडर-17 फुटबॉल संघाची नवीन जर्सी
SHARES

भारतात पहिल्यांदाच 'फिफा अंडर- 17 विश्वचषक' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिन्याभरानंतर होणाऱ्या या स्पर्धेत विविध देशातील 24 संघांनी सहभाग घेतला आहे. शू आणि स्पोर्टस् वेअर तयार करणाऱ्या नाईकी कंपनीद्वारे खेळाडूंसाठी ही नवीन जर्सी तयार करण्यात आली आहे.या जर्सीवर एका बाजूला केसरी रंगाची पट्टी दिली आहे. ही जर्सी वजनाला अत्यंत हलकी आहे. तसेच खेळाडूंना खेळताना येणारा घाम शोषला जाऊ शकेल अशी जर्सी खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही जर्सी टाकाऊ पाण्याच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या वितळवून त्यातून सूक्ष्म धागा बनवून पॉलिस्टरच्या कापडापासून जर्सीची तयार करण्यात आली आहे.


भारतीय फुटबॉल संघासाठी ही नवीन संधी आहे. ती आम्ही सोडणार नाही. आम्ही आमच्या विरोधकांना घाबरत नाही. आपल्या देशासाठी सर्वस्व पणाला लाऊ.

जॅक्सन सिंह, खेळाडू


अंडर-17 मध्ये भारतीय संघ इतिहास रचणार आहे. आमचे फुटबॉलमधील कौशल्य जगाला दाखवून देऊ.

सुरेश सिंग वांगजाम, खेळाडूहेही वाचा - 

फिफा अंडर-17च्या या प्रोमो साँगची फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ!

फिफा अंडर-17 ट्रॉफीचे अनावरण


संबंधित विषय