Advertisement

एमडीएफए लीग : गौरांग शिंदेच्या हॅटट्रिकमुळे सारा एफएचा विजय


एमडीएफए लीग : गौरांग शिंदेच्या हॅटट्रिकमुळे सारा एफएचा विजय
SHARES

परळ येथील सेंट झेवियर ग्राऊंडवर झालेल्या एमडीएफए लीगमधील थर्ड डिव्हिजन गटातील सामन्यात गौरांग शिंदेने गोल्सची हॅटट्रिक झळकावली अाणि अापल्या सारा एफए संघाला याॅन एफसीविरुद्ध ५-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. अाक्रमण अाणि बचाव अशा दोन्ही अाघाड्यांवर दमदार खेळ करत सारा एफए संघानं हे दमदार यश संपादन केलं.


पहिल्या सत्रातच मोठी अाघाडी

ज्ञानेश्वर जांगिटवार याने १३व्या मिनिटालाच सारा एफएचे खाते खोलले. त्यानंतर पुढच्या मिनिटाला गौरांग शिंदेने अापला पहिला गोल केला. दोन मिनिटांनंतर पुन्हा एकदा गोल करत त्याने संघाची अाघाडी ३-० अशी वाढवली. १९व्या मिनिटाला रोहेब हजारीने चौथा गोल लगावल्यानंतर काही मिनिटांनी गौरांगने पुन्हा एकदा गोल करत अापली हॅटट्रिक साजरी केली अाणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.


एफसी चिंचोलीचा दणदणीत विजय

दरम्यान, एफसी चिंचोली संघाने याच गटातील दुसऱ्या सामन्यात इंडियन फुटबाॅल क्लबवर ४-० असा दणदणीत विजय साकारला. करण देबनाथचे दोन गोल चिंचोलीच्या विजयात महत्त्वाचे ठरले. शुभम पांडे अाणि शादाब शेख यांनीही प्रत्येक एक गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले.


हेही वाचा -

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

मुंबईच्या प्रशिक्षकाचा फैसला शुक्रवारी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा