Advertisement

मुंबई सिटी एफसीचा प्रतिस्पर्धी संघाच्या फॅन्ससाठी खास स्टँड


मुंबई सिटी एफसीचा प्रतिस्पर्धी संघाच्या फॅन्ससाठी खास स्टँड
SHARES

मुंबई सिटी फुटबाॅल क्लबने अापल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी मुंबई फुटबाॅल एरिनामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फॅन्ससाठी खास एक स्टँड राखीव म्हणून ठेवला अाहे. असं पाऊल उचलणारा मुंबई सिटी एफसी हा हिरो इंडियन सुपर लीगच्या इतिहासातील पहिला संघ ठरला अाहे. १७ डिसेंबरला अॅटलेटिको डे कोलकाताविरुद्ध होणाऱ्या सामन्यापासून प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल.



अापल्या देशातील फुटबाॅल चाहत्यांच्या संस्कृतीला पाठिंबा देण्यासाठी अाम्ही हे प्रगतीशील पाऊल उचलले अाहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांशी झुंजत असताना अामच्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला त्यांचे चाहते प्रोत्साहन देत असताना पाहणे रंजक ठरणार अाहे. त्यामुळे स्टेडियममध्ये एक चांगले वातावरण तयार होईल अाणि फुटबाॅलच्या प्रसारासाठी ते प्रेरक ठरेल.
- रणवीर सिंग, मुंबई सिटी एफसीचा सहमालक


प्रतिस्पर्धी चाहत्यांसाठी २०० सीट्स

प्रतिस्पर्धी चाहत्यांसाठी ४-बी हा स्टँड राखीव ठेवला असून पहिल्या मुख्य दरवाज्यातून त्यांना अात प्रवेश करता येईल. या स्टँडमध्ये प्रतिस्पर्धी चाहत्यांसाठी २०० सीट्स राखीव असतील अाणि त्यांना BookMyShow या संकेतस्थळावरून तिकीटे मिळवता येतील.



मुंबई सिटी एफसीची संमिश्र कामगिरी

मुंबई सिटी एफसीने रविवारी मुंबई फुटबाॅल एरिनावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईयन एफसीचा १-० असा पराभव केला. मुंबईची इंडियन सुपर लीगमधील कामगिरी संमिश्र असून त्यांनी अातापर्यंत ५ सामन्यांत ७ गुण मिळवले अाहेत. त्यात दोन विजय, एक बरोबरी अाणि दोन पराभवाचा समावेश अाहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा