मुंबई पोर्ट ट्रस्टची आगेकूच

  Parel
  मुंबई पोर्ट ट्रस्टची आगेकूच
  मुंबई  -  

  'मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीग'मध्ये शनिवारी फर्स्ट डिव्हिजनमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई पोर्ट ट्रस्टने एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन संघाला अत्यंत चुरशीच्या लढतीत 2-1 ने हरवले. हा सामना परळ येथील झेविअर्स मैदानावर खेळविण्यात आला होता.

  या सामन्यात सुरूवातीला पीरेल शॉकवांगनाव याने 7 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून पोर्ट ट्रस्ट संघाला आघाडी मिळवून दिली. पण 30 व्या मिनिटाला 'ईएसआयसी'च्या आंद्रे फर्नांडीस याने गोल करत सामना बरोबरीत आणून ठेवला. त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या उबेद अन्सारी ने 38 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

  यापुर्वीच्या सामन्यात सेंट पॉल विरुध्द सी व्ह्यू संघात झालेल्या सामन्यात सेंट पॉल संघाने सी व्हयू संघावर 6-5 अशा फरकाने विजय मिळवला. अरनॉल्ड सलडान्हा याने 2, तर चेतन जगनादे, शेन मनेजेस, स्वप्नील म्हात्रे, नीझॉन रॉड्रीग्ज यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.