फुटबॉल सामन्यात मुंबई वॉरीर्यसचा विजय

  Andheri west
  फुटबॉल सामन्यात मुंबई वॉरीर्यसचा विजय
  मुंबई  -  

  अंधेरी स्पोर्टस कॉम्पलेक्स येथे झालेल्या सुपर डिव्हीजन एमडीएफए फुटबॉल सामन्यात मुंबई वॉरीर्यनं विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीत मुंबई वॉरीर्यरने ३-० अशा फरकाने बॅंक ऑफ इंडियाचा धुव्वा उडवला. तसंच मुंबई वॉरीर्यरच्या स्ट्रायकर इकेन्ना अहुकन्ना याने सुरुवातीच्या दहा मिनिटात गोल करत आपल्या संघास आघाडीवर आणून ठेवले. तर युसूफ बंकी याने ३३व्या मिनिटाला आणि ४४व्या मिनिटाला दोन गोल पूर्ण करून सामना आटोपला.

  तीसऱ्या डिव्हीजनमध्ये एसआसएस स्पोर्टींग विरुद्ध बीपीसीएल रिफीनेरीससोबत झालेल्या सामन्यात एसआरएस स्पोर्टींगने २-० अशा फरकाने विजय मिळवला. तर एसआरएस स्पोर्टींगच्या विनायक नेवाले आणि विनीत कोळी याने प्रत्येकी एक गोल करत सामन्यावर विजय मिळवला. बीपीसीएलला एक ही गोल करता न आल्याने पराभव पत्कारावा लागला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.