Advertisement

अवर लेडी अाॅफ इजिप्लला अाॅर्लेम कप फुटबाॅल स्पर्धेचे जेतेपद


अवर लेडी अाॅफ इजिप्लला अाॅर्लेम कप फुटबाॅल स्पर्धेचे जेतेपद
SHARES

गोलकीपर विक्रम सिंग याने केलेल्या सुरेख संरक्षणामुळे कलिना येथील अवल लेडी अाॅफ इजिप्त पॅरिशने पाचव्या अाॅल-मुंबई इंटर-पॅरिश फुटबाॅल स्पर्धेचे म्हणजेच अाॅर्लेम सुपर कपचे जेतेपद पटकावले. अटीतटीच्या झालेल्या या अंतिम लढतीत टायब्रेकरमध्ये विक्रम सिंगने प्रतिस्पर्ध्यांचे तीन प्रयत्न हाणून पाडले तर अवर लेडी अाॅफ इजिप्तने पहिल्या तिन्ही प्रयत्नांत गोल करत जेतेपद अापल्याकडेच राखले. टायसन परेरा, डॅन डायस अाणि बिपीन रावत यांनी केलेल्या गोलमुळे अवर लेडी अाॅफ इजिप्तने कुर्ल्याच्या होली क्राॅस पॅरिशविरुद्ध ३-० असा विजय मिळवला.


निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी

अवर लेडी अाॅफ लाॅर्डेस पॅरिशने अायोजित केलेल्या या स्पर्धेत कलिना अाणि कुर्ला येथील या संघांनी अापली दादागिरी दाखवून दिली. अंतिम लढतीत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर रेफ्रींनी टायब्रेकर खेळविण्याचा निर्णय घेतला.


पेनल्टी-शूटअाऊटमध्ये रंगला थरार

पेनल्टी-शूटअाऊटमध्ये अवर लेडी अाॅफ इजिप्तच्या स्ट्रायकर्सनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करत अापल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडली. होली क्राॅसच्या स्ट्रायकर्सच्या मार्गात विक्रम सिंगचा अडसर होता. विक्रमने होली क्राॅसच्या एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. मात्र होली क्राॅसचा शैलेश जाधव हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. सर्वाधिक गोल केल्याबद्दलचा गोल्डन बूट टायसन परेरा (अवर लेडी अाॅफ इजिप्त) याने पटकावला. याच संघाचा विक्रम सिंग हा स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ठरला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा