SHARE

बेंगॉल क्लबने आयोजित केलेल्या आतंरशालेय 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सेंट लॉरेन्स संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. ही स्पर्धा गुरुवारी शिवाजी पार्क मैदानावर खेळवण्यात आली.

या लढतीत सांताक्रूझच्या सेक्रेड हार्टने कांदिवलीच्या सेंट लॉरेन्सला 2-0 अशा फरकाने मात दिली. मिडलफिल्डर अशुतोष सावंत याने केलेल्या मदतीमुळे बिशाल पारेख आणि ध्रुव बेलगवे या दोघांनी प्रत्येकी एक गोल केले. त्यामुळे सेक्रेड हार्टला बेंगॉल क्लबच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरता आले.

कांदिवलीच्या सेंट लॉरेन्स शाळेतील मुलांनी प्रतिस्पर्धी संघाला चांगलीच लढत दिली. पहिल्या अर्ध्या वेळेत सेंट लॉरेन्स संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात सेंट लॉरेन्सचा ध्रुवने दुसरा गोल करत संघ विजय करण्यात यश मिळवले.


हेही वाचा - 

शालेय फुटबॉल स्पर्धेत बीशार पारेखची चमकदार कामगिरी


संबंधित विषय
ताज्या बातम्या