शालेय फुटबॉल स्पर्धेत बीशार पारेखची चमकदार कामगिरी


शालेय फुटबॉल स्पर्धेत बीशार पारेखची चमकदार कामगिरी
SHARES

सोळा वर्षांखालील आतंरशालेय फुटबॉल स्पर्धेत कांदिवलीच्या सेंट लॉरेन्स शाळेने ठाण्याच्या श्री. मा. विद्यालयला ३-० अशा फरकाने मात देत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बेंगाल क्लबतर्फे आयोजित ही स्पर्धा शनिवारी शिवाजी पार्क मैदानावर रंगली होती.

या सामन्यात पहिल्या अर्ध्यावेळेत बीशार पारेखने सातव्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवली. त्यानंतर सलग दोन गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.पवईमध्ये झालेल्या इतर सामन्यात दादरच्या सेंट पॉल शाळेने एस. एम. शेट्टीला ३-० अशा फरकाने मात देत विजय मिळवला. अथर्व रेवालच्या दोन गोलमुळे संघाचा विजय सोयीस्कर झाला.

याच दरम्यान झालेल्या आणखी एका सामन्यात जुहूच्या उत्पाल संघवी शाळेने सीएसटीएमच्या अंजुमन इस्लाम शाळेला २-० अशा गुण संख्येने मात देत विजय मिळवला. या सामन्यात उत्पालच्या रोहित शाह आणि जनक कुलेरीया या दोघांनी प्रत्येकी एक गोल केला.


हेही वाचा - 

फुटबॉल लीगमध्ये वांद्रे पॅकर्सची कार्मेलाईट्स एससीवर मातमडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय