SHARE

16 वर्षाखालील आतंरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीत कांदिवलीच्या सेंट लॉरेन्स आणि सांताक्रूझच्या सॅक्रेट हार्ट शाळेने बाजी मारली आहे. दोन्ही संघाने आपल्या प्रतिस्पर्धींना नमवत यश मिळवले. बेंगाल क्लबतर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा सोमवारी शिवाजी पार्क मैदानावर खेळवण्यात आली.

यापूर्वी झालेल्या फुटबॉल सामन्यात सेंट लॉरेन्स शाळेने दादरच्या सेंट पॉल शाळेचा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. या खेळात सेंट लॉरेन्सच्या अनुराग तावडे याने दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. याच संघातील ध्रुव बेलगावे याने तीसरा गोल करत सेंट पॉल्सला 3-0 अशा फरकाने मात दिली.

उपांत्य फेरीतील इतर सामना सांताक्रूझच्या सॅक्रेड हार्ट विरुद्ध उत्पाल संघवी असा झाला. यामध्ये दोन्ही संघाला पूर्ण वेळेत एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत ठरला. पण पंचाच्या निर्णयाने टाय ब्रेकरमध्ये सॅक्रेड हार्ट शाळच्या काने सिमोस, जॉन कटके, मोसेस अलेक्झांडर आणि उतर्ष बगोरिया यांनी चार गोल करत उपांत्य फेरीत विजय मिळवला. दरम्यान उत्पाल संघाला दोनच गोल करण्यात यश आले.


हेही वाचा - 

शालेय फुटबॉल स्पर्धेत बीशार पारेखची चमकदार कामगिरी


संबंधित विषय
ताज्या बातम्या