Advertisement

स्पोर्टस गुरुकुलचे मुंबईत टीएसजी फुटबॉल स्कुल


स्पोर्टस गुरुकुलचे मुंबईत टीएसजी फुटबॉल स्कुल
SHARES

द स्पोर्टस गुरुकुलतर्फे (टीएसजी) अनेक खेळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जातो. त्यांच्याकडून अाता मुंबईत टीएसजी फुटबाॅल स्कूल सुरू करण्यात अाले अाहे. मुलांना फुटबाॅल खेळण्याची संधी अाणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अाता टीएसजीमार्फत केले जाणार अाहे. सांताक्रूझ पश्चिम येथील अाॅल इंडिया ब्लाकनजी बारी येथे फुटबाॅलची शिबिरे अायोजित केली जाणार अाहेत.


फुटबॉलमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे अाम्ही खेळाडूंना व्यावसायिक दृष्टिकोनातून संधी उपलब्ध करून देण्याचा विचार करत अाहोत. टीएसजी फुटबॉल स्कूलच्या साहाय्याने मुंबईतील फुटबॉलपटू घडविण्यासह वर्षभरात देशाच्या अन्य भागातील खेळाडूंनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अामचा प्रयत्न राहील. अव्वल दर्जाचे प्रशिक्षक अाणि अांतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन युवा फुटबाॅलपटूंना मिळणार अाहे.
- जय शाह, द स्पोर्टस गुरुकुलचे सहसंस्थापक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा