Advertisement

सोमवारच्या विशेष सत्रात १ लाख १३ हजार महिलांचं लसीकरण

महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर सोमवारी आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विशेष सत्रामध्ये १ लाख १३ हजार महिलांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारच्या विशेष सत्रात १ लाख १३ हजार महिलांचं लसीकरण
SHARES

महिलांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी महापालिकेतर्फे सोमवारी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर सोमवारी आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विशेष सत्रामध्ये १ लाख १३ हजार महिलांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर येत आहे.

या लसीकरणासाठी महापालिकेच्या आणि शासकीय सर्व केंद्रावर पूर्वनोंदणी न करता पहिली आणि दुसरी मात्रा घेण्याची सुविधा महिलांसाठी खुली केली होती. या अंतर्गत शहरातील १ लाख १३ हजार ९३५ महिलांना लस देण्यात आली. महापालिकेनं दुसऱ्यांदा महिलांसाठी विशेष लसीकरण आयोजित केले होते.

शाळा सुरू होण्याच्या पाश्र्वभूमीवर आज सकाळी नऊ ते दुपारी दोन या सत्रामध्ये शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील विद्यार्थ्यांंच्या लसीकरणासाठी विशेष सत्र राबविण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षण संस्थेचं ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. दुपारी ३ ते रात्री ८ या सत्रामध्ये सर्व केंद्रावर केवळ दुसऱ्या मात्राधारकांसाठी लसीकरण आयोजित केलं जाणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही पहिली मात्रा दिली जाणार नाही, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

सोमवारी मुंबईत ३७७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सोमवारी नव्यानं सापडलेल्या करोना रुग्णांमुळे बाधितांची एकू ण संख्या ७ लाख ४१ हजार ६१७ झाली आहे. सोमवारी ३३४ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १८ हजार ३३६ झाली आहे. सध्या मुंबईत ४ हजार ७०२ उपचाराधीन रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी पाच रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तसेच मृतांध्ये ४ पुरूष व तीन महिला होत्या. ६ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के  आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १८९ दिवसांवर पोहोचला आहे. सोमवारी मुंबईत ३० हजार ६९२ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकू ण एक कोटी दोन लाख ४७ हजार ६६४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ५२ इमारती प्रतिबंधित आहेत तर बाधितांच्या संपर्कातील २ हजार ३५६ नागरिकांचा शोध सोमवारी घेण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा