Advertisement

ठाणे, पालघर, रायगडसाठी कोरोना लशीचे १ लाख डोस

तिन्ही जिल्ह्यांसाठीच्या लसीचा साठा ठाण्यात ठेवण्यात आला आहे. या लशीच्या डोसचे महापालिकांना वितरण करण्याचं काम सुरू झालं आहे.

ठाणे, पालघर, रायगडसाठी कोरोना लशीचे १ लाख डोस
SHARES

ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांसाठी कोरोना लशीचे १ लाख ३ हजार डोस बुधवारी पहाटे ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. तिन्ही जिल्ह्यांसाठीच्या लसीचा साठा ठाण्यात ठेवण्यात आला आहे. या लशीच्या डोसचे महापालिकांना वितरण करण्याचं काम सुरू झालं आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात   लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

बुधवारी पहाटे सीरम इन्स्टि्ट्युटकडून ठाणे मंडळासाठी १ लाख ३ हजार लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. ठाणे मंडळामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. लशीचे तीन जिल्ह्य़ांत वितरण करण्यात येणार आहे.  त्यामध्ये ठाणे जिल्ह्याला ७४ हजार, पालघर जिल्ह्याला १९ हजार आणि रायगड जिल्ह्याला ९ हजार लशीचे डोस मिळणार आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील २९ लसीकरण केंद्रांत लसकुप्या पोहोचवण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्य़ाला ७४ हजार कुप्या देण्यात येणार असल्या तरी पहिल्या टप्प्यासाठी  ठाणे जिल्ह्य़ातील ६२ हजार ७५० सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. या सर्वाना ही लस दिली जाणार आहे, तर उर्वरित दहा टक्के लशीचा अतिरिक्त साठा असणार आहे.

प्रत्येक केंद्रात दिवसाला १०० लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. १६ जानेवारी रोजी रोझा गार्डनिया, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या दिवशी ४०० लोकांना लस देण्यात येणार आहे.

महापालिकेनुसार लसीचे वर्गीकरण

महापालिका                लस

ठाणे                      १९,१००

कल्याण – डोंबिवली       ५,८००

नवी मुंबई                 २१,२५०

उल्हासनगर                ५,३००

भिवंडी                      ३,३००

मिरा भाईंदर                ८०००हेही वाचा -

"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळालाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा