Advertisement

अंधेरीतील रेस्टॉरंटमधील 'इतके' कर्मचारी कोरोनाबाधित

सध्या या बाधित कर्मचाऱ्यांना बीकेसीमधील कोविड जम्बो रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

अंधेरीतील रेस्टॉरंटमधील 'इतके' कर्मचारी कोरोनाबाधित
SHARES

मुंबईसह राज्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधित संख्या वाढत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत १००० नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील अंधेरीमधील रेस्टॉरंटमध्ये १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सध्या या बाधित कर्मचाऱ्यांना बीकेसीमधील कोविड जम्बो रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिम येथील एस.वी रोडवर असणाऱ्या राधा कृष्ण रेस्टॉरंटमध्ये १० कर्मचाऱ्यांची कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली. यापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर हॉटेल सीन करण्यात आले होते. हा घटनेच्या आठवडाभरानंतर अंधेरीत हा प्रकार घडला आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत १ हजार १०३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २९ हजार ८४२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारी दिवसभरात ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३ लाख ७ हजार २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत १० हजार ४५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा