Advertisement

मीरा भाईंदरमध्ये सोमवारी आढळले १०६ रुग्ण, तर ६ जणांचा मृत्यू

मीरा भाईंदरमध्ये सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी COVID 19 चे १०६ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मीरा भाईंदरमध्ये सोमवारी आढळले १०६ रुग्ण, तर ६ जणांचा मृत्यू
SHARES

मीरा भाईंदरमध्ये सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी COVID 19 चे १०६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे बुधवारी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी एमबीएमसीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. सरकार त्यापासून बचाव करण्यात गुंतलेलं असलं तरी, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाचला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २१ हजार ३९७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे  आतापर्यंत ६७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सोमवारी, मीरा-भाईंदरमध्ये १०६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २१ हजार ३९७ वर पोहचला आहे. तसंच या आजारानं मृतांचा आकडा ६७७ वर पोहोचला आहे. मंगळवारी, ११० लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १९ हजार ४१३ च्या घरात गेला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास बुधवारी भाईंदर पूर्वेतील २२, भाईंदर पश्चिममधील २३ आणि मीरा रोडमधील ६१ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारनं ३१ सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा