Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ११३ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (३ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन ११३ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ११३ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (३ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन ११३ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४४,९०३ झाली आहे.

 मंगळवारी बेलापूर २६, नेरुळ २७, वाशी ५, तुर्भे १३, कोपरखैरणे ५, घणसोली १०, ऐरोली २५, दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५३ नेरुळ १९, वाशी २९, तुर्भे ९, कोपरखैरणे १९,  घणसोली ११ ऐरोली २३, दिघामधील ९ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२,३६८ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९११ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १६२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा -

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा