Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १२१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १२१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर  ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कळंबोलीतील ३, पनवेल आणि खांदा कॉलनी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

२१० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये खारघरमधील २२, कळंबोली-रोडपाली येथील २२, नवीन पनवेलमधील २०, पनवेलमधील १९, कामोठ्यातील १९, खांदा कॉलनीतील ८, तळोजा वसाहतीमधील ३, नावडे येथील २, तळोजा जेल क्वार्टस येथील २, तसेच घोट-कोयनावेले, सिध्दी करवले, तळोजा आएएफ कँप येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ६६२८ कोरोना रूग्णांपैकी ५१५७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३०६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -  

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी
संबंधित विषय
Advertisement