Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १३० नवीन कोरोना रुग्ण

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८९०३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७१७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २२६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १३० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१४ ऑगस्ट) १३० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर  ११ मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ९ रूग्णांचा यापूर्वीच झाला आहे. परंतु या ९ रूग्णांच्या मृत्यूचा अहवाल आज मिळाल्याने आज नोंद केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये खांदा कॉलनीतील ३, खारघरमधील ३, कामोठ्यातील २ तसेच नवीन पनवेलमधील, पनवेल आणि धरणा कँप येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

१२२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.  पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील १८, कामोठ्यातील २८, खांदा कॉलनीतील ७, खारघरमधील १९, पनवेलमधील १८, नवीन पनवेलमधील २५, तळोजा येथील १३ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८९०३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७१७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १५०४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार
संबंधित विषय