Advertisement

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन १३३ रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन १३३ रुग्ण आढळले. तर एक जणाचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन १३३ रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन १३३ रुग्ण आढळले.  तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,०५६ झाली आहे. यामध्ये १०८१ रुग्ण उपचार घेत असून ४९,९४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व २२, कल्याण प ३७, डोंबिवली पूर्व ३४,  डोंबिवली प ३२, मांडा टिटवाळा ६, तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तर इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

काशीमिरात ४ वर्षांच्या मुलीचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहनRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement