Advertisement

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे १३९ नवे रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी COVID 19 चे १३९ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे १३९ नवे रुग्ण, ५ जणांचा मृत्यू
SHARES

मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी COVID 19 चे १३९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे बुधवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची वाढते रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी एमबीएमसीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. सरकार त्यापासून बचाव करण्यात गुंतलेलं असलं तरी, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाचला आहे.

शुक्रवारी १३९ रुग्ण सापडल्यानंतर आता मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे एकूण २१ हजार १०६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ६६२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनामुळे जवळपास १४६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १९ हजार झाला आहे.

गुरुवारी , मीरा-भाईंदरमध्ये १७९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २० हजार ८०५ वर पोहचला आहे. तसंच या आजारानं मृतांचा आकडा ६५१ वर पोहोचला आहे. मंगळवारी, १४६ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १८ हजार ६८० च्या घरात गेला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास बुधवारी भाईंदर पूर्वेतील २४, भाईंदर पश्चिममधील १३ आणि मीरा रोडमधील १०२ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारनं ३१ सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा