Advertisement

Lumpy Skin Disease: ठाण्यात 14 जनावरे पॉझिटिव्ह आढळली

पशुसंवर्धन आयुक्तांनी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.

Lumpy Skin Disease: ठाण्यात 14 जनावरे पॉझिटिव्ह आढळली
(Representational Image)
SHARES

ठाण्यातील 14 जनावरांना लम्पी त्वचारोग झाल्याचे आढळून आलं आहे. त्याचा प्रसार आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथपर्यंत झाला आहे. रक्ताचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आढळले.

शिवाय, अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील जनावरांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्येही लम्पी रोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय त्याच दिवशी शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथमधील 5 किलोमीटर परिघातील गावांमध्ये तसेच बदलापूरच्या रमेश वाडीमध्ये सर्व प्राण्यांसाठी लसीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

संसर्ग झालेल्या जनावरांना आणि त्यांच्या कळपातील इतरांना लसीकरण करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांनी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेने स्वनिधीतून 10,000 लसींची व्यवस्था केली असून राज्य सरकारकडून अतिरिक्त 10,000 लसीच्या कुपी मिळणार आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्याला 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केले आणि विषाणू संसर्गाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात गुरेढोरे फिरण्यास बंदी घातली. तीन तालुक्यांमध्ये आतापर्यंत एकूण 5,017 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.



हेही वाचा

लम्पी आजाराचा फैलाव माणसांमध्ये होऊ शकतो का? जाणून घ्या

लम्पी आजाराचा वाढता धोका, पालिका अलर्टवर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा