अखेर मार्डचे 152 डॉक्टर्स सेवेत रुजू

 Mumbai
अखेर मार्डचे 152 डॉक्टर्स सेवेत रुजू

मुंबई - पालिका प्रशासनाने रजेवर गेलेल्या डॉक्टरांना नोटिस दिल्या आहेत. न्यायालय, राज्य सरकारकडूनही डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 152 डॉक्टर्स सेवेत दाखल झाले असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

"डॉक्टरांनी केलेल्या सुरक्षेची मागणी मान्य करण्यात आली आहे. डॉक्टरांवर हल्ले होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येईल. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या वतीने त्वरीत 400 आणि आणि 1 एप्रिलपासून 300 अशाप्रकारे 700 शस्त्रधारी जवान तैनात केले जाणार आहेत. आतापर्यंत 152 आंदोलनकर्ते डॉक्टर्स सेवेत रुजू झाले आहेत. यामध्ये वांद्रयातील भाभा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या अधिक आहे," असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

Loading Comments