Advertisement

चिंता वाढली, राज्यात शनिवारी १५,६०२ नवे कोरोना रुग्ण

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

चिंता वाढली, राज्यात शनिवारी १५,६०२ नवे कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शनिवारी राज्यात  १५ हजार ६०२ नवीन रुग्ण आढळले. तर ८८ जणांचा मृत्यू झाला.  

शनिवारी ७४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शुक्रवारी ही संख्या ११ हजार ३४४ इतकी होती.  राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५२५ वर  पोहचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ टक्के इतका आहे.  आतापर्यंत एकूण २१ लाख २५ हजार २११ रुग्ण बरे झाले आहेत.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७४ लाख ०८ हजार ५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ९७ हजार ७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७० हजार ६९५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा