Advertisement

मुंबईतील कामा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी २०० खाटांचं नियोजन

महिलांसाठी असणाऱ्या कामा रुग्णालयाची ३३० रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात १०० खाटा कोविड रुग्णांसाठी आधीच ठेवण्यात आल्या होत्या. त्यात आणखी १०० खाटांचं नियोजन करण्यात येईल.

मुंबईतील कामा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी २०० खाटांचं नियोजन
SHARES

कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील कामा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी अधिकच्या १०० खाटा वाढविण्यासंदर्भातील नियोजन करण्यात यावं, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

महिलांसाठी असणाऱ्या कामा रुग्णालयाची ३३० रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात १०० खाटा कोविड रुग्णांसाठी आधीच ठेवण्यात आल्या होत्या. त्यात आणखी १०० खाटांचं नियोजन करण्यात येईल.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी कामा रुग्णालयाला भेट देऊन या  रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.तुषार पालवे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

एकूण २०० खाटा

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक  खाटांची संख्या वाढविण्यात आली. कामा रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्रपणे १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या सव्वा वर्षात या रुग्णालयात कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविडची (coronavirus) तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अजून १०० खाटा म्हणजेच एकूण २०० खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्याचं नियोजन करण्यात यावं. मात्र हे नियोजन करीत असताना इथं ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याबाबतचंही नियोजन करण्यात यावं. कामा रुग्णालयात पहिल्यांदाच इंटेन्सिव्ह केअर युनिट बरोबरच हाय डिपेंडन्सी युनिट सुरु केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलं.

हेही वाचा- कोरोनाने निराधार झालेल्या बालकांना राज्य सरकार देणार आधार

लसीकरणासाठी स्वतंत्र पथक  

आज महाराष्ट्रातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागरिक लसीकरणासाठी गर्दी करु शकतात हे लक्षात घेऊन लसीकरणासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावं. यामध्ये स्वतंत्रपणे नागरिकांचं नोंदणीकरण, लस देण्याबाबतचा तपशील यांचा समावेश करण्यात यावा. कामा रुग्णालयामध्ये याबाबत स्वतंत्र पथक करण्यात आले असल्याबाबतची माहिती (amit deshmukh) अमित देशमुख यांना यावेळी देण्यात आली.

रुग्णालयाचं आधुनिकीकरण

कामा रुग्णालयाचं आधुनिकीकरण करण्याबाबतचं नियोजन करण्यात यावं. मुंबईतील कामा रुग्णालयाचा १३० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. कामा रुग्णालयाची वास्तू पुरातन वास्तू समजली जात असल्याने या रुग्णालयाचं आताच्या काळानुसार  आधुनिकीकरण कसं करता येईल, इथं वेगवेगळ्या कोणत्या सुविधांची वाढ करता येऊ शकेल याबाबतचे नियोजन करण्यात यावं. तसंच येणाऱ्या काळात कामा रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर सुरु कसं करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात यावं, असे निर्देशही अमित देशमुख यांनी यावेळी दिले.

(200 beds will reserve in cama hospital mumbai for covid 19 patients )

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा