Advertisement

कल्याण डोंबिवलीत मंगळवारी आढळले 'इतके' नवीन रुग्ण

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १९ हजार ३२ इतका झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत मंगळवारी आढळले 'इतके' नवीन रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. मंगळवारी महापालिका क्षेत्रात २०७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १९ हजार ३२ इतका झाला आहे. आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासाच्या कालावधीत ३०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १२ हजार ९२७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्व २ ५, कल्याण पश्चिम ७१, डोंबिवली पूर्व ५१ ,डोंबिवली पश्चिम ५२ , मांडा टिटवाळा ५  आणि मोहनेतील  ३ रुग्णांचा समावेश आहे. सद्या महापालिका क्षेत्रात ५  हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा -

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा