Advertisement

नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत २१ बळी

नवी मुंबई महापालिकेने म्युकरमायकोसिसचा प्रभाव रोखण्यासाठी रूग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केली आहे.

नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत २१ बळी
SHARES

नवी मुंबई म्युकरमायकोसिसने आतापर्यंत २१ जणांचा बळी घेतला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ८६ रुग्ण आढळले आहेत. यामधील ४९ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या शहरात म्युकरमायकोसिच्या नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई महापालिकेने म्युकरमायकोसिसचा प्रभाव रोखण्यासाठी रूग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केली आहे. म्युकरमायकोसिस रूग्णशोधासह मोफत तपासणी, चाचण्या व उपचाराची  सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करण्याकरिता बाह्यरुग्ण सुविधा (OPD) कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. याठिकाणी गरज भासल्यास डायग्नोस्टिक टेस्ट्सची व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच पालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात म्युकरमायकोसिस वरील रूग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 एखाद्या रूग्णाला शस्त्रक्रियेची गरज भासली तर ही शस्त्रक्रिया गुंतागुतीची असल्याने शहरातील नामांकीत सर्जनचे एक पॅनल बनविण्यात आले असून आवश्यकतेनुसार त्यांच्या सेवा उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत. म्युकरमायकोसिस बाबत तिन्ही महापालिका रूग्णालयाच्या ओपीडी मधील तपासणी, टेस्ट्स तसेच वाशी रूग्णालयातील उपचार विनामूल्य केले जात आहे. 

राज्य सरकारने म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालय सेक्टर १० वाशी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल सेक्टर ५ नेरुळ, इंद्रावती हॉस्पिटल सेक्टर ३ ऐरोली, तेरणा हॉस्पिटल सेक्टर २२ नेरुळ या रुग्णालयांचा समावेश आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा