Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २४६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२८ ऑगस्ट) २४६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पनवेल, खांदा कॉलनी आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २४६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२८ ऑगस्ट) २४६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पनवेल, खांदा कॉलनी आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १३५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ४९, कामोठ्यातील ४४, खांदा कॉलनीतील ७, खारघरमधील ५४, पनवेलमधील ४१,  नवीन पनवेलमधील ४०, तळोजा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ११, कामोठ्यातील ४२, खारघरमधील २७, पनवेलमधील २५,  नवीन पनवेलमधील १९, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ११,२०९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ९७९१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ११४२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा