Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२७ जानेवारी) २५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२७ जानेवारी) २५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच कामोठेमधील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २,  नवीन पनवेल ६, खांदा काॅलनी ३, कळंबोली ३, कामोठे २, खारघर येथील ९ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १२, नवीन पनवेल १०, कळंबोली ८,  कामोठे ६, खारघर येथील २१ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८६११ कोरोना रूग्णांपैकी २७७२३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६२२ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २६६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा