Advertisement

२५ वर्षानंतर ५७ वर्षीय महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली

तरूण वयातच लिंडा कोटक यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उपचारांच्या इतक्या व्यापक प्रवासानंतर तिचा त्रास संपला नाही.

२५ वर्षानंतर ५७ वर्षीय महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली
SHARES

तरुण वयातच हिपच्या एव्हस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन) या आजाराची  समस्या असल्याने उपचारासाठी देशभर फिरून कुठेही तिच्यावर उपचार होऊ शकला नाही. यातच वेगवेगळ्या दुखण्याने शरीरावर १२ शस्त्रक्रिया करूनही फरक न पडल्याने या आजारावर कुठेही उपचार नाही असा समज पक्का होऊ लागला होता. अशातच महिलेवर मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातले कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंन रिप्लेसमेंट तज्ज्ञ अँण्ड स्पाइन सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. एकेकाळी परावलंबी जीवन जगणारीही महिला तब्बल २५ वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभी राहू शकली.

हेही वाचाः- मुंबईत दिवसभरात १०६२ नवे रुग्ण, ५४ जणांचा दिवसभरात मृत्यू

लिंडा कोटक असं या महिलेचे नाव आहे. या महिलेला हिपच्या एव्हस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन) ची लक्षणे होती. यामुळे तरूणवयातच या महिलेचा खोबा निकामी झाला होता. त्यामुळे चालताना, उठायला आणि बसायलाही त्रास जाणवत होता. चालणे-फिरणे बंद होऊन दैनंदिन कामे करणेही अवघड झाले होते. वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजेच १९९५ मध्ये त्यांच्या डाव्या खोब्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. १९९६ मध्येही शस्त्रक्रिया करून इम्पॉंट बसवण्यात आले होते. २००५ मध्येही शस्त्रक्रिया झाली. कोटक यांना कोणाच्याही आधाराविना चालता येत नव्हते. चालताना त्यांना काठी किंवा वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. याशिवाय घरी वावरताना त्या सरकत जात असे. यामुळे त्यांच्या उजव्या घोट्याला फ्रॅक्चर आणि डाव्या खांद्याच्या दुखापत झाली होती. चालता येत नसल्याने त्यांच्या मणका आणि गुडघ्यावरही खूप ताण आला होता. यासाठीही त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिवाय २०१९ मध्ये कोटक यांच्यावर स्पाईन सर्जन सुद्धा करण्यात आली. २०१२ मध्ये दोन्ही गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

हेही वाचाः- राज्यात ९६१५ कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात २७८ जणांचा मृत्यू

तरूण वयातच या लिंडा कोटक यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उपचारांच्या इतक्या व्यापक प्रवासानंतर तिचा त्रास संपला नाही. फेब्रुवारी २०२० मध्ये लिंडा कोटक यांना सांधे दुखीचा त्रास जाणवू लागला. कुटुंबियांनी पाच वेळा स्थानिक रूग्णालयात दाखल केले. मात्र त्रासाने त्या असह्य झाल्या होत्या, त्यामुळेच लिंडा यांना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले. या रूग्णालयातील कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंन रिप्लेसमेंट तज्ज्ञ अँण्ड स्पाइन सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांच्याकडे उपचार सुरू झाले. यावेळी डॉक्टरांनी कांस्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप रिप्लेसमेंट (टीएचआर) हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबियांची परवानगी घेऊन १६ जून रोजी लिंडा कोटक यांच्यावर हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे लिंडा कोटक  पुन्हा चालू-फिरू लागली.


 "कांस्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप प्रत्यारोपण ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. लिंडा कोटक यांना अनेक वर्षांपासूनच दुखणं होतं. अनेक शस्त्रक्रिया झाल्या पण काही फरक पडला नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं आमच्यासाठी एक आव्हान होतं. हे आव्हान आम्ही स्विकारून शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणी आल्या. अस्थिर हिपवर शस्त्रक्रिया करणे हे खूप दुर्मिळ आहे. परंतु, धीराने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. साधारणतः पाच दिवस अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. परिणामी, आता ही महिला पुन्हा चालू-फिरू शकतेय."

डॉ. गिरीश भालेराव

कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंन रिप्लेसमेंट तज्ज्ञ अँण्ड स्पाइन सर्जन, वोक्हार्ट रूग्णालय

१२ शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा माझ्या पायावर उभी राहू शकेल अशी मला आशा नव्हती. पण वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी आज पुन्हा चालू लागले आहे. आता मी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची कामे करू शकते, याचा मला आनंद आहे..

 लिंडा कोटक,रूग्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा