Advertisement

मुंबईत दिवसभरात १०६२ नवे रुग्ण, ५४ जणांचा दिवसभरात मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात ११५८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७८ हजार २६० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत दिवसभरात १०६२ नवे रुग्ण, ५४ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात काल पहिल्यादांच एका दिवसात कोरोना रुग्णांनी १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज कोरोनाने २७८ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात १०६२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५४ रुग्ण दगावले आहेत. तर २२ जुलै रोजी ५८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २३ जुलै रोजी एकूण ५५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे १२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ६८९१ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ११५८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७८ हजार २६० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख  ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३  हजार ७१४  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७  हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७  हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६८ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’

राज्यात नोंद झालेले  २७८  मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा