Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ( ३० सप्टेंबर) २५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २७१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ( ३० सप्टेंबर) २५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २७१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ८ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील ३, कळंबोलीतील २, कामोठ्यातील २ तसेच नवीन पनवेल येथील एका रूग्णाचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३५, नवीन पनवेल ३३, खांदा काॅलनी २६, कळंबोली २८, कामोठे ५२, खारघर ७१, तळोजा  येथील १२ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४७,   नवीन पनवेल ५९, कळंबोली ३५, कामोठे ६३, खारघर ६४,  तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १९२५७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १६९७० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १८६१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.  हेही वाचा -

राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा