Advertisement

आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयितांना मुंबईत आणणार

कोरोनाचे संकट वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशातील २६ हजार भारतीय मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयितांना मुंबईत आणणार
SHARES

देशात आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कोरोनाचे संकट वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशातील २६ हजार भारतीय मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. ३१ मार्चपर्यंत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ वर गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर गेला आहे. युएई, कुवैत, कतार आणि ओमन या आखाती देशांमधून २६ हजार कोरोना संशयित मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील यंत्रणा यासाठी सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत ते रुग्ण मुंबई विमानतळावर दाखल होऊ शकतील. या देशांमधून दररोज २३ फ्लाईट येणार आहेत. या २६ हजार भारतीयांना क्वॉरन्टाईन करण्यासाठी मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला तयारी करावी लागणार आहे.

कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी कार्यालयीन उपस्थिती कमी करण्याचा आणि गर्दी टाळण्यासाठी पावले उचलली आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शासकीय कार्यालयात एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येण्याचा सूचना केल्या आहेत.

रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा