Advertisement

राज्यात २८,४३८ नवे रुग्ण, 'इतके' रुग्ण झाले बरे

राज्यात नवीन रुग्णांची संख्या घटत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. राज्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

राज्यात २८,४३८ नवे रुग्ण, 'इतके' रुग्ण झाले बरे
SHARES

राज्यात नवीन रुग्णांची संख्या घटत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. राज्यासाठी हा मोठा दिलासा आहे. मंगळवारी राज्यात २८ हजार ४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका झाला आहे. तर मृत्यूदर १.५४ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहे.

 राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा  ५४ लाख ३३ हजार ५०६ झाला आहे. सध्या ४ लाख १९ हजार ७२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ करोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के नोंदवण्यात आला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



हेही वाचा -

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा