Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३०८ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२४ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३०८ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३०८ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी (२४ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३०८ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २३,३२१ झाली आहे.

सोमवारी बेलापूर ३४, नेरुळ ९०, वाशी ३३, तुर्भे १५, कोपरखैरणे ५२, घणसोली ३९, ऐरोली ४३ आणि दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३३८  जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६५, नेरुळ ६३, वाशी ४३, तुर्भे ६, कोपरखैरणे ६५, घणसोली ५३, ऐरोली ३७ आणि दिघामधील ६ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९६६८ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५४५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८३ टक्के झाला  आहे. 



हेही वाचा - 

गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही  

लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा