Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी ३१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (८ नोव्हेंबर) ३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी ३१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (८ नोव्हेंबर) ३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ७, नवीन पनवेल १, खांदा काॅलनी ५, कळंबोली २, कामोठे ४, खारघर ११, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल १८, कळंबोली ११, कामोठे १५, खारघर येथील २९ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४०२५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २२९१८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६१ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५४६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा