Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२४ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (२४ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३४,४९९ झाली आहे.

गुरूवारी बेलापूर ५२, नेरुळ ६१, वाशी ४६, तुर्भे ३९, कोपरखैरणे ५६, घणसोली २५, ऐरोली ४५, दिघामध्ये १ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४११ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५९, नेरुळ ६८, वाशी ४१, तुर्भे ६४, कोपरखैरणे ५०,  घणसोली ६०, ऐरोली ६०, दिघामधील ९ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३०२८३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ७२२ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात

नाकावाटेही दिली जाऊ शकते कोरोना लस, सीरमकडून ट्रायलला सुरुवात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा